वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की

राजकोट : वृत्तसंस्था 

राजकोट येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ १८१ धावात संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात केलल्या ६४९ धावांच्या डोंगरापुढे वेस्ट इंडिजला निम्मी धावसंख्या उभा करता आली नाही. भारताने विंडीजवर फॉलोऑन लादला आहे. त्यामुळे टीम इंडिया विंडीजचा दुसरा डावही आजच गुंडाळून विजय मिळवते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9de9ca6-c935-11e8-a311-a18dd8ccc3bf’]

वेस्ट इंडिजने आज सहा बाद ९४ धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. चेस आणि पॉल यांनी आज संयमाने फलंदाजी करत  धावसंख्या १४७ वर पोहोचवली. मात्र उमेश यादवने अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या पॉलला ४७  धावांवर बाद करुन भारताला सातवं यश मिळवून दिलं. मग १५९ धावसंख्या असताना अश्विनने ५३ धावांवर चेसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आल्या आल्याच लेविसलाही शून्यावर त्रिफळाचित करत अश्विनने विंडीजला नववा धक्का दिला. त्यानंतर तळाचा फलंदाज गॅबरीलला रिषभ पंतने यष्टिचीत केल्याने विंडीजवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
पहिल्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक ४ गडी बाद केले. मोहम्मद शमीने २ तर उमेश यादव, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

विद्यार्थी नाही तर चक्क प्राध्यापकांनी केले कामबंद आंदोलन

त्याआधी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकाहून एक सरस खेळी केली . कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ रवींद्र जाडेजानंही या कसोटीत शतक ठोकलं. विराटनं कसोटी क्रिकेटमधलं चोविसावं, तर जाडेजानं पहिलं शतक झळकावलं. त्यामुळं टीम इंडियाला नऊ बाद ६४९ धावांवर आपला पहिला डाव घोषित करता आला. या कसोटीत भारताच्या रिषभ पंतचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं.

[amazon_link asins=’B014R90AJA,B00L0X2M8E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a093e086-c937-11e8-bf7e-bd4e4309aa9b’]