अभिनेत्री मौनी रॉय आणि राजकुमार राव यांचा ‘रोमँटीक’ व्हिडीओ व्हायरल ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार मौनी रॉय आणि राजकुमार राव यांचा एक रोमँटीक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ शाहरुख खान आणि काजोलची आठवण करू देत आहे. सध्या मौनी आणि राजकुमारचा हा रोमँटीक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कभी खुशी कभी गम या सिनेमातील रोमँटीक गाण्यावर दोघं डान्स करताना दिसत आहेत.

मौनी रॉयने सिंपल प्रिंटेड साडी नेसली आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. व्हिडीओत दोघांचाही रोमँटीक अंदाज पाहायला मिळत आहे. सुरज हुआ मध्धम असे या गाण्याचे बोल आहेत. राजकुमार शाहरुखच्या अंदाजात आणि मौनी काजोलच्या अंदाजात दिसत आहेत. दोघांचा डान्स पाहण्यासारखा आहे.

हा व्हिडीओ मौनीने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे जो प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करताना मौनी म्हणाली, “फिल्मी गानों के रंग रघु-रुक्मिणी के संग”

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच राजकुमार राव आणि मौनी रॉय मेड इन चायना या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 25 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

👩🏻🥼👖 #MICPromotions

A post shared by mon (@imouniroy) on

 

Visit  :Policenama.com

 

 

You might also like