Rajkumar Rao-Shahnaz Gill | काय सांगता, खरच राजकुमार राव वडील होणार ?, शहनाज गिलसमोर केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन – Rajkumar Rao-Shahnaz Gill | नुकताच प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावचा (Actor Rajkummar Rao) ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हा चित्रपट (Rajkummar Rao Movie ‘Monica O My Darling’) प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अभिनेता राजकुमारने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु केले आहे. तसेच राजकुमार राव अलीकडेच शहनाज गिलच्या (Shahnaz Gill) नवीन चॅट शो देसी ‘वाइब्स’मध्ये (Shahnaz Gill Chat Show Desi ‘Vibes’) दिसला आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये शहनाज गिल आणि राजकुमार राव (Actor Rajkummar Rao) दोघेही खूपच धमाल करताना दिसले आहेत. या चॅट शो दरम्यान शहनाजने (Shahnaz Gill) राजकुमारला त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी (Actor Rajkummar Rao Personal Life) संबंधित काही प्रश्न विचारले.

 

 

या प्रश्नांचे उत्तर देताना राजकुमार रावने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असलेले बरेच मोठे खुलासे (Rajkummar Rao Life Big revelations) केले आहेत. या चॅट शो दरम्यान शहनाजने राजकुमारला एक खास प्रश्न विचारला. तो म्हणजे ‘तुला बाळ कधी हवं आहे?’. दरम्यान या प्रश्नावर राजकुमार म्हणाला की, “मी सध्या याबाबत विचार केलेला नाही. तसेच याबाबत काही योजनाही नाही. म्हत्वाच म्हणजे मला असं वाटतं की मी अजून लहान आहे.पण यासोबतच मला जर बाळ हव असेल तेव्हा मला मुलगी हवी असल्याचे राजकुमारने शहनाजला सांगितले. तसेच तो म्हणाला की, ‘मला मुलगी असेल तर ती तुझ्यासारखीच पूर्णपणे गोड, सुंदर आणि प्रतिभावान असावी.”

 

 

दरम्यान शहनाज गिलने या चॅट शोचा प्रोमो आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच ही पोस्ट शेअर करताना शहनाजने एक कॅप्शन देखील दिली आहे. यावेळी तिने लिहिले की, ‘स्वप्न सत्यात उतरतात आणि आज ते घडले आहे. मला नेहमीच अतिशय प्रतिभावान अभिनेते राजकुमार राव सोबत काम करायचे होते आणि आज मी माझ्या पहिल्या चॅट शो – ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ मध्ये पाहुणे म्हणून त्याच्यासोबतच शूट केले आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यामुळेच मी अक्षरशः सातव्या स्वर्गात आहे. तसेच राजकुमार राव माझी विनंती मान्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात.’

 

तसेच शहनाज गिलच्या या पोस्टवर कमेंट करताना राजकुमारने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
यावर राजकुमार राव म्हणाला की, “मोनिका शहनाज मोनिका शहनाज मी कोणाकडे लक्ष द्यावे? तुझ्याशी बोलून खूप मजा आली.
तसेच माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एकावर तुझ्यासोबत डान्स करण्यासाठी आणि मला तुझ्या शोमध्ये आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम आणि शुभेच्छा.”

 

Web Title :- Rajkumar Rao-Shahnaz Gill | is rajkumar rao going to be a father big disclosure made in front of shahnaz gill

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delhi Crime | ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियसीचे केले 35 तुकडे; वसईच्या श्रद्धा वालकरचे खून प्रकरण

Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन