प्रत्येक मुलाच्या चेहर्‍यावर हसू आणणं आपलं सर्वांचं कर्तव्यच : रामकुमार शेडगे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बालदिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी त्यांचा वाढदिवस कामायनी संस्थेतील विशेष मुलांसोबत अनोख्या पद्धतीने बालदिन व वाढदिवस साजरा केला गेला. रंगीबेरंगी फुगे, शुभेच्छा पत्रके, नक्षीदार टोप्या यावेळी मुलांनी डोक्यात परिधान केल्या होत्या. हवेत फुगे सोडून मुलांनी यावेळी आनंद साजरा केला. तसेच याचबरोबर मुलांना खाऊचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक रामकुमार शेडगे, कालिदास सुपाते कामायनी संस्थेचे व्यवस्थापक, सुजाता आंबे प्राचार्य, आशा देशपांडे, संचालक, नारायण शिंदे, श्रीलेखा कुलकर्णी, अभिनेते आशुतोष भोसले, उद्योजक वसंत अंबिके, सुरेश उकिरडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Rajkumar Shedge
कार्यक्रमाच्या सुरवातीला रामकुमार शेडगे यांना कामायनी संस्थेतील विद्यार्थ्यांनी औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी शेडगे यांनी कामायनी संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व यावेळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अ.ब.क चित्रपटातील विविध अनुभव सांगितले. त्याच बरोबर मुलांना चित्रपटसृष्टीत विनोदी किस्से सांगून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. शेडगे पुढे म्हणाले की माझ्या आगामी चित्रपटात कामायनी संस्थेतील काही विद्यार्थ्यांना चित्रपट काम करण्याची संधी देणार आहे.
Rajkumar Shedge
कालिदास सुपाते कामायनी संस्थेचे व्यवस्थापक म्हणाले की चित्रपटसृष्टीत कलाकार व दिग्दर्शक मंडळी यांनी आमच्या संस्थेला भेट देत असतात पण आज बालदिनानिम्मित दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी त्यांचा वाढदिवस आमच्या विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला व त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले त्या बद्दल आम्हाला खूप आनंद झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण शिंदे यांनी केले.

Visit : Policenama.com