पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हा सध्या चर्चेत आहे.‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ (Monika O My Darling) या चित्रपटामुळे तो चर्चेत तर होताच त्याचबरोबर त्यांनी केलेल्या आता एका विधानामुळे तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. राजकुमार राव (Rajkummar Rao) चे चाहते त्याच्या आगामी चित्रपट ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ ची आतुरतेने वाट पाहत असतानाच त्यांनी हे विधान केले आहे.
राजकुमार राव ने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, “एक काळ माझ्या आयुष्यात असा होता जेव्हा मी हिरोच्या रोल साठी ऑडिशन देणे बंदच केले होते. जेव्हा मी हिरोच्या रोल साठी ऑडिशन द्यायला जायचो तेव्हा मला हिरोच्या मित्राच्या रोल साठी ऑडिशन देण्याचे सल्ले अनेकांनी दिले होते. हो मी खरच गुड लुकिंग नाहीये हे मला मान्य आहे. एवढेच नाही तर काही लोकांनी मला माझ्या उंचीवरून, आयब्रोज वरून आणि केसांवरून देखील मला बोलले होते. या सगळ्याचा कंटाळा आल्यामुळे मी काही दिवस ऑडिशनला जाणे बंद केले. पण दिवाकर बॅनर्जी (Diwakar Banerjee) यांनी माझ्यामध्ये काहीतरी वेगळे नक्कीच बघितले असणार.
‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ या चित्रपटात राजकुमार राव सोबत हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि
राधिका आपटे (Radhika Apte) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट कॉमेडी क्राईम ड्रामा
सोबत सस्पेन्स थ्रिलरने भरलेला आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे राजकुमार रावने
‘रन’ (Run Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि हा चित्रपट हिट देखील ठरला होता.
Web Title :- Rajkummar Rao | actor rajkumar rao said the important thing in bollywood industry
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Police Suspended | पिंपरी चिंचवडमध्ये तीन पोलीस निलंबित, भंगारवाल्याकडून घेतले होते पैसे
Narayan Rane | ‘राणेसाहेब… अजितदादांचा नाद करु नका’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा नारायण राणेंना सल्ला