Rajkummar Rao Reception | राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; पाहा लग्नानंतरच्या स्टार जोडप्याचा पहिला फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rajkummar Rao Reception | बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने (Rajkummar Rao ) अभिनेत्री पत्रलेखा पॉल सोबत (patralekha paul) लग्न केले आहे. दोघांनी चंदीगड मधील ओबेरॉय सुखविलासमध्ये त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नानंतर राजकुमार राव आणि पत्रलेखाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासोबतच त्यांच्या लग्नात (Rajkummar Rao Reception) कोणते सेलिब्रिटी पोहोचले याचे फोटोही समोर येत आहेत.

 

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबरला दुपारी थाटामाटात लग्न केले. यानंतर संध्याकाळी भव्य रिसेप्शन पार्टीही आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या रिसेप्शन पार्टीला फिल्म स्टार्सशिवाय देशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. आता राजकुमार राव (Rajkummar Rao Reception) आणि पत्रलेखा (patralekha paul) यांच्या रिसेप्शन पार्टीचा पहिला फोटो समोर आला आहे. या छायाचित्रात हे बॉलिवूड स्टार कपल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्यासोबत दिसत आहे.

 

 

 

 

स्वतः मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर राजकुमार राव (rajkummar rao) आणि पत्रलेखा (patralekha paul) यांच्या रिसेप्शन पार्टीचा पहिला फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात राजकुमार राव आणि पत्रलेखा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत उभे आहेत. फोटोमध्ये पत्रलेखा सोनेरी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती, तर राजकुमार राव काळ्या रंगाच्या टक्सीडो सूट मध्ये खूपच स्मार्ट दिसत आहे.

 

 

हे छायाचित्र शेअर करत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चंदीगड येथे
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहून
वधू-वरांना शुभेच्छा (Rajkummar Rao Reception) आणि यशस्वी वैवाहिक जीवन.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शनचा पहिला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Web Title :- rajkummar rao and patralekha wedding haryana cm manohar lal khattar attended star couple reception party see first photo of newly weds rajkummar rao and patralekha paul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा