#VideoViral : DDLJच्या ‘त्या’ सीनची आठवण करून देत आहे लवकपल राजकुमार-पत्रलेखा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांचा सुपरडुपर हिट रोमँटीक सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आजीह लोकांच्या मनात आपली खास जागा बनवून आहे. मुलींना वाटतं की त्यांना राजसारखा प्रियकर मिळावा जो त्यांच्यासाठी चालत्या ट्रेनमध्ये चढेल. बॉलिवूडच्या एका लवकपलने नुकतीच ही इच्छा पूर्ण केली आहे.

हे वाचून तुम्ही कन्फ्युज झाला असाल ना. सध्या अभिनेता राजकुमार राव आणि त्याची प्रेयसी पत्रलेखा दोघेही राज आणि सिमरन बनून सोशलवर गाजताना दिसत आहे. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत असे म्हणणे नक्कीच वावगे ठरणार नाही. आज राजकुमार राव आपल्या सोशल मीडिया वॉलवर किंग ऑफ रोमँस शाहरुख खानच्या अंदाजात दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर दोघांच्या प्रेमाचा क्युटनेस तु्म्हाला जाणवेल.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिनेातील क्लायमॅक्स दोघांनी दाखवला आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा दोघांनीही हा सीन उत्तम साकारला आहे. दोघेही आपल्या रोलमध्ये पूर्णपणे बुडून गेले आहेत. पत्रलेखा खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे. राजकुमार रावने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टावरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अवघ्या 5 तासात या व्हिडीओला 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.