‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून बलात्कार ‘पीडित’ तरुणीनं स्वत:ला केलं आगीच्या ‘स्वाधीन’, उपचार सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका बलात्कार पीडित तरुणीने गुरुवारी स्वत:ला आग लावून दिली. पीडितेने स्वत:ला रॉकेल टाकून पेटवून घेतले. ही घटना 2 च्या सुमारास घडली. पीडितेला त्यानंतर गंभीर अवस्थेत जवळच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. गावातील दोन तरुणांवर बलात्काराचा आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप लावण्यात आला आहे. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

राजनांदगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकरण डोंगरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. सांगितले जात आहे की 19 वर्षीय तरुणीवर काही दिवसांपूर्वी बलात्कार झाला होता. आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ दाखवून आरोपी पीडित तरुणीला ब्लॅकमेल केले जात होते. ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडितेने स्वत:ला जळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

60 टक्के भाजली पीडिता
पीडिता जवळपास 60 टक्के भाजली. गंभीर परिस्थितीत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजनांदगावचे नायब तहसीलदार वर्षा तिवारी यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आरोपींना लवकर ताब्यात घेण्यात येईल. घटनेनंतर परिसरात दु:खाचे वातावरण आहे.

छत्तीसगडच्या विलासपूरमध्ये देखील आज बलात्काराचे प्रकरण समोर आले. विलासपूरच्या कोनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे, तपास सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/