‘भारताच्या एक इंच जमीनीला जगातील कोणतीही ताकद स्पर्श नाही करू शकत’ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्‍यावर आहेत. आज ते पहिले संरक्षण प्रमुख जनरल विपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्यासह लेह येथे पोहोचले. यानंतर ते लडाखला गेले. लडाखमध्ये संरक्षणमंत्रींनी सैन्य दलाच्या जवानांशी चर्चा केली.

भारतीय सैनिकांना संबोधित करतांना राजनाथ सिंह म्हणाले की, सीमा विवाद सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहेत, परंतु तो किती प्रमाणात सोडवला जाऊ शकतो याची मी हमी देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो की, जगाची कोणतीच शक्ती आपल्यापासून एक इंची जमीनही घेऊ शकत नाही. तसेच हा वाद चर्चेद्वारे सोडवला तर यापेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही, असंही ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी लडाखमधील सैनिकांना सांगितले की, ‘अलीकडे PP14 वर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान आपले काही सैनिक शहीद झाले. येथे तुम्हा सर्वांना भेटून मला आनंद झाला आहे, परंतु त्यांच्या शहीदमुळे मी दुःखी देखील आहे. मी त्यांना आदरांजली वाहतो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लुकांगमध्ये भारतीय सेना आणि आयटीबीपीच्या जवानांसह बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्याशी चर्चा केली. तेथे त्यांनी सैनिकांना मिठाई देखील खाऊ घातली.