Rajnath Singh | आगामी काळात संपूर्ण देशात समान नागरी कायदा – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची योग्य वेळ आली आहे, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले आहेत. एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह (Rajnath Singh) बोलत होते.

 

यावेळी राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, आता देशात समान नागरी कायदा संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. ज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली असेल किंवा करणार असतील, अशा सर्वांचे मी अभिनंदन करतो. आगामी काळात सर्व राज्यांत समान नागरी कायदा लागू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 

यावेळी राजनाथ सिंह यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले. दिल्लीतील बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्या घृणास्पद कृत्य आहे.
दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे सिंह म्हणाले. गुजरात निवडणुकीवर बोलताना सिंह म्हणाले, फक्त गुजरात नाही,
तर केंद्रातदेखील 2024 ला मोदी पुन्हा निवडून येणार. आम्ही गुजरात विधानसभादेखील काबीज करू.
आमच्या कामगिरीच्या आधारावर गुजरात जिंकणार आहोत. पंतप्रधानांचे देशातील दौरे पाहा. ते खूप मेहनत करत आहेत.
यामुळे भारत पुढे जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मोदींवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे.
राजकारणात प्रतिष्ठा असली पाहिजे. खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना अशी भाषा शोभत नाही.
पंतप्रधान ही एक व्यक्ती नसून, संस्था आहे. काँग्रेस हताश आणि हतबल झाल्याचे दिसत आहे.
त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत, असे यावेळी राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

 

Web Title :- Rajnath Singh | rajnath singh it is time to implement uniform civil code across the country rajnath singhs big statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर