Video : ‘भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखच्या पूर्व भागात असलेल्या पँगाँग लेक परिसरातून भारत आणि चीन या दोन्ही देशात समेट झाला आहे. इतकंच नाही तर परस्पर सहमतीनं त्यांनी सैन्यही मागे घेतलं आहे अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना दिली.

राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे अशी घोषणा राज्यसभेत केली. 1962 च्या पूर्वीपासून भारताच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रभाव पडल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारनं निवेदन द्यावं अशी मागणी केली होती. त्यानुसार राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली.

पँगाँग सीमेवरून सहमती
राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल 2020 च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीननं आतापर्यंत या भागात केललं बांधकाम जमीनदोस्त केलं जाणार आहे. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

सीमेवर शांतता नांदण्याला प्राधान्य
राजनाथ सिंह म्हणाले की, भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करून सीमेवर शांतता नांदावी याला प्रधान्य देण्यात आलं आहे. आम्ही एकही इंच जमी कोणालाही देणार नाही. गतवर्षी चीकडून या भागात मोठ्या शस्त्रास्त्रांचा साठा करण्यात आला होता. यावरून भारतीय सैन्यानं चीनविरोधात पुरेशी कारवाई केली आहे. सप्टेंबर महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. परिस्थिती पूर्वीसारखी असावी हे आमचं ध्येय आहे असंही त्यांनी नमूद केलं.

चर्चेच्या 9 व्या टप्प्यात झाली सहमती
भारत आणि चीन यांच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार, दोन्ही देशांचं सैन्य पँगाँग लेकच्या उतर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. सूत्रांनी अशी माहिती दिलीय की, पँगाँग लेकच्या फिगर 4 येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला नो पेट्रोलिंग झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. चीनी सैन्य फिगर 8 आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजे फिगर 2 वरून फिगर 3 वर मागे येणार आहे.