संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा आणि नोएडाचे आमदार पंकज सिंह ‘कोरोना’ व्हायरसने संक्रमित, हॉस्पीटलमध्ये दाखल

नोएडा : वृत्त संस्था – देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 37 हजारच्या पुढे गेला आहे आणि आतापर्यंत 65 हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. याच दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा व नोएडाचे आमदार पंकज सिंह (41) कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत. पंकज सिंह यांनी ट्विट करून सांगितले की, ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांनी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

पंकज सिंह यांनी ट्विट केले आहे की, कोरोनाची सुरूवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पीटलमध्ये भरती झालो आहे. माझी विनंती आहे की, तुमच्या पैकी जे लोका मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आयसोलेट होऊन आपली टेस्ट करावी.

उत्तर प्रदेशच्या जनपद गौतमबुद्ध नगरमध्ये मंगळवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 103 नवी प्रकरणे समोर आली. यासोबत संक्रमितांची एकुण संख्या 8 हजाराच्या पुढे गेली आहे. एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. जिल्हा देखरेख अधिकारी नीरज त्यागी यांनी सांगितले की, मागील 24 तासात 103 लोक कोविड-19 व्हायरसने संक्रमित झाले आहेत. तर 104 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात 1,067 लोकांवर उपचार सुरू आहे, तर 6,946 संक्रमितांचा आतापर्यंत यशस्वी उपचार झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे जनपदमध्ये आतापर्यंत 45 लोकांचा मृत्यू झाला आहे.