Rajpal Yadav | अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणीत वाढ; चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गोंधळ

पोलीसनामा ऑनलाइन : Rajpal Yadav | कर्नलगंजमध्ये चालू असलेल्या शूटिंग दरम्यान गोंधळ झाल्याने बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव सध्या अडचणीत अडकला आहे. शूटिंग दरम्यान राजपालने स्कूटरने विद्यार्थ्याला धडक दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याच्यावर तक्रार नोंदवली आहे. तर विद्यार्थ्याविरोधात राजपाल यादवनेही आरोप करत तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. (Rajpal Yadav)

शशांक श्रीवास्तव हा अल्लापूरचा रहिवासी सध्या एक चित्रपट बनवत आहे. ज्यामध्ये राजपाल यादव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बँक रोड चौकात एक सीन शूट करण्यात येत होता. यावेळी अभिनेता आणि इतर क्रू मेंबर ही उपस्थित होते. अभिनेत्याला या सीन मध्ये स्कूटर चालवायचे होते. स्कूटर चालवत असताना स्कूटरची क्लच वायर तुटल्यामुळे स्कूटर अनियंत्रित होऊन जवळच उभ्या असलेल्या ई-रिक्षाला धडकली. यामुळे शेजारीच उभा असलेला विद्यार्थी बालाजी यालाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे. (Rajpal Yadav)

या संपूर्ण घटनेनंतर विद्यार्थ्यांनी विरोध केला असता क्रू मधील काही लोकांनी त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा
आरोप विद्यार्थ्यांनी तक्रारीमध्ये केला आहे.त्याचबरोबर त्याच्याशी गैरवर्तन करत त्याला शिवीगाळ केली आणि
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संपूर्ण घटनेची माहिती मिळताच कर्नलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचून स्कूटरला ताब्यात घेतली आणि पुढील तपास करत आहेत. दरम्यान कर्नलगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी राममोहन राय यांनी सांगितले की, “दोन्ही तक्रारदारांकडून तक्रार नोंदवली गेली आहे. चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल. मात्र आता याप्रकरणी राजपाल यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही”. या घटनेमुळे सध्या राजपाल यादव यांचे चाहते चिंतेत दिसत आहेत.

Web Title :- Rajpal Yadav | complaint against actor rajpal yadav misbehavior and abuse with student

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘आज पुणे बंद आहे, हळूहळू महाराष्ट्र बंद होईल; पुणे बंदची दखल केंद्र सरकारने घ्यावी’ – संजय राऊत

Pune Crime | अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पतीच्या मित्राकडून बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना