अभिनेता राजपाल यादवला ‘त्यानं’ मुलीसाठी कानाखाली मारली, नंतर झालं असं काही (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉमेडी अभिनेता राजपाल यादव सोशलवर सक्रिय असतो. गेल्या अनेक दिवसांपासून राजपाल सोशलवर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. राजपाल यादवनं पुन्हा एकदा एक कॉमेडी व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. राजपालनं इंस्टावरून व्हिडीओ शेअर केला आहे. राजपालच्या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

व्हिडीओत दिसत आहे की, राजपाल यादव आपल्या सहकाऱ्यासोबत बसला आहे. एवढ्यात एका मुलीची एन्ट्री होते. ती म्हणते तू माझ्यासाठी तुझ्या मित्राला कानाखाली मारू शकतो का. असं म्हणताच तो राजपाल यादवच्या कानाखाली लावतो. यानंतर ती मुलगी त्याला 1000 रुपये देते. यानंतर राजपाल यादव 500 -500 वाटून घेतात आणि आनंदानं उड्या मारतात. हा व्हिडी सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहते राजपालचा हा कॉमेडी व्हिडीओ वारंवार पहात आहेत.

राजपाल यादवचा कॉमेडी टायमिंग कमाल आहे. चाहते तर त्याच्या कॉमेडीचे फॅन आहेत. सुरुवातीच्या काळात त्यानं अनके निगेटीव रोलही केले आहेत. 1997 साली तो नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला होता. सध्या आपल्या कॉमेडी व्हिडीओमुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.