‘राजश्री’नं पुन्हा शूट केलं ‘दीदी तेरा देवर दीवाना’, ‘या’ कलाकारांनी ‘धारण’ केलं सलमान आणि माधुरीचं ‘रूप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजश्री प्रॉडक्शन संस्कारी सिनेमा आणि मालिकांसाठी ओळखलं जातं. सध्या त्यांची ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ ही टीव्ही मालिका खूप लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. या मालिकेच्या सेटवर सध्या काही निराळाच नजारा दिसला आहे. या शोधील दोन कलाकार माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या दीदी तेरा देवर दीवाना गाण्यातील गेटअपमध्ये दिसले. या मालिकेतील ही प्रमुख जोडी आहे. अनघा भोसले माधुरीच्या तर अंकित रायजादा समलानच्या गेटअपमध्ये होता. ‘दीदी तेरा देवर दीवाना’ गाण्यावर त्यांनी डान्सही केला.

सलमान-माधुरीच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करतानाचा आपला अनुभव सांगताना अनघा म्हणाली, “हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखं होतं. माधुरी दीक्षित माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. माधुरीच्या गेटअपमध्ये डान्स करताना मी सातव्या आसमानावर होते. मला 30 मिनिटांच्या आत या गाण्यासाठी तयार व्हावं लागलं. हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. हावभाव हुबेहूब येण्यासाठी मी हे गाणं अनेकदा पाहिलं.”

सलमानच्या गेटअमध्ये दिसलेला अंकित रायजादा म्हणतो, “माझ्यासाठी हा खपू वेगळा अनुभव होता. कारण हम आप के है कौन हा सिनेमा माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. या गाण्यावर सलमान खानच्या गेटअपध्ये डान्स करणं म्हणजे माझ्यासाठी अविश्वसनीय अनुभव होता. मला माहिती होतं की, मी सलमान खानसारखं करू शकणार नाही. परंतु माझ्याकडून त्यांच्यासाठी ही एक भेट आहे.