‘नागिण’ डान्स करणं 3 शिक्षकांना पडलं ‘महाग’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका सरकारी शाळेत प्रशिक्षणादरम्यान नागिण डान्स करणं 3 शिक्षकांना महागात पडलं आहे. सदर तीनही शिक्षकांना कामावरून निलंबित करण्यात आलं आहे. राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील ही घटना आहे. 10 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. बुधवारी या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात एका महिला शिक्षिकेचाही समावेश आहे.

सरकारी शाळेतील तीनही शिक्षकांच्या नागिण डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर तीनही शिक्षक प्रशिक्षणासाठी आलेल्या इतर शिक्षकांचे मनोरंजन करत होते. यासाठी त्यांनी नागिण डान्स केला. याचवेळी काहींनी त्यांचा व्हिडीओ तयार केला. जो नंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

जलोर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अशोक रोशेवाल या प्रकरणी बोलताना म्हणाले की, “नागिण डान्स करणाऱ्या तीनही शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. यातील दोन शिक्षक नव्यानं नियुक्त झाले होते. त्यांच्या डान्समुळं कोणालाही इजा झालेली नाही. परंतु त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.” असे ते म्हणाले.

Visit : Policenama.com