Raju Dravid Passes Away | शिवछत्रपती पुरस्कार विजेते खो-खोपटू राजू द्रविड यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाईन : Raju Dravid Passes Away | क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खो-खो, कबड्डी अशा रांगड्या खेळाबरोबरच ॲथलेटिक्समध्ये आपली छाप पाडणारे अष्टपैलू खेळाडू तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू राजेंद्र द्रविड यांचे प्रदिर्घ आजाराने काल रात्री उशिरा राहत्या घरी निधन (Raju Dravid Passes Away) झाले. ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या माघारी अर्जुन पुरस्कार विजेती पत्नी सुरेखा द्रविड आणि दोन मुले असा परिवार आहे.

क्रीडा जगतात राजेंद्र द्रविड यांची ‘राजू’ म्हणूनच ओळख होती. शालेय जीवनापासूनच त्यांची नाळ मैदानाशी जोडली गेली होती. खो-खोमध्ये त्यांनी 1967 ते 1983 अशी 16 वर्षे आपली कारकीर्द घडवली. या दरम्यान त्याने कबड्डी आणि ॲथलेटिक्समध्येदेखील त्यांनी आपली छाप पाडली होती.

1980 मध्ये राजेंद्र द्रविड यांनी भारताचा तेव्हाचा अव्वल धावपटू आदिल सुमारीवालाला हरवून राष्ट्रीय स्पर्धेत
100 मीटर धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब पटकावला होता.
राजेंद्र द्रविड यांना1977-78 मध्ये राज्य शासनाकडून शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
राजेंद्र द्रविड यांनी आपल्या महाविद्यालयीन कारकिर्दीत पुणे विद्यापाठीच्या खो-खो, कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

Web Title :- Raju Dravid Passes Away | shiv chhatrapati award winner kho kho player raju dravid passes away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Aurangabad ACB Trap | प्रशिक्षणातून सवलत देण्यासाठी लाचेची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Anurag Kashyap | ‘सेक्रेड गेम्स 3’ येणार नाही; अनुराग कश्यप यांचे मोठे वक्तव्य

Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडेने घेतला मोठा निर्णय; म्हणाली – ‘मी यापुढे…’