Raju Shetti | बदल्यांच्या नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दर दोन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या (Officers Transfer) नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे हे अधिकाऱ्यांकडून खंडणी (Extortion) वसूल करतात, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

दर दोन वर्षाला अधिकाऱ्यांकडून बदलीच्या नावाखाली मंत्री (Minister) खंडणी वसूल करतात. त्यामुळे प्रशासनातील (Administration) अधिकाऱ्यांना जरी सातवा वेतन आयोग (7 th Pay Commission) किंवा पगार (Salary) जास्त असला तरी त्यांनी मंत्र्यांना आणि कर्यकर्त्यांना दिलेला पैसा शेतकऱ्यांकडून आणि सर्वसामान्यांकडून वसूल करतात. प्रशासनातील अधिकारी काही साधू संत नाहीत तर शेतकऱ्यांना लुबाडतात, असा आरोप राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला.

पारनेर तालुक्यातील मांडवा येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस परिषद (Sugarcane Conferences) आणि शेतकरी मेळाव्यासाठी राजू शेट्टी आले होते. त्यानंतर त्यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बदल्यांच्या नावाखाली मंत्री हे अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला. सातव्या वेतन आयोगाच्या पगारातून खंडणी देणं शक्य नसल्याने अधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटतात, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे काल परवा नेवासा तालुक्यातील महसूलच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्याकडून एकरी 400 रुपयांची मागणी केल्याचे शेट्टी यांनी सांगितलं.

साखर आयुक्तपदी IAS तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा

ऊस परिषदेत एक रकमी एफ.आर.पी. (FRP) मागील वर्षाची एफ.आर.पी. अधिक 300 रुपयांची मागणी राजू शेट्टी
यांनी केली. तसेच रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, सर्व कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावे,
IAS तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांची साखर आयुक्त पदी नियुक्ती करावी,
शेती पंपाचे भारनियमन कमी करुन विना कापात, 12 तास वीज शेतकऱ्यांना मिळावी, ओला दुष्काळ जाहीर
करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी, अवसानातील पारनेर सहकारी साखर
कारखान्याचे पुनर्जीवन करावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे (State Government) केली.

Web Title :-  Raju Shetti | swabhimani shetkari saghtana leader raju shetti claims maharashtra goverment minister take bribe from goverment servant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update