Raju Shetti | सत्ता नसल्याने भाजपचे सगळे नेते ‘कासाविस’, राजू शेट्टी यांची भाजपवर टीका

पुणे (Pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यपाल (Governor) महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त 12 आमदारांच्या (MLA) पत्रावर (letter) स्वाक्षरी (Signature) करायला वेळ नसेल अशा कडवट शब्दात शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकारने (State Government) विधानपरिषदेवर नियुक्त करायच्या 12 सदस्यांची यादी दिली आहे. यामध्ये राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे नाव असल्याची चर्चा आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून यादी राज्यपालांकडे पडून आहे. त्यावर अद्याप राज्यपालांनी (Governor) स्वाक्षरी केली नाही. यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्यपालांवर टीका केली. Raju Shetti | there no time sign letter 12 mlas appointed governor legislative council raju shettys harsh word

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

भाजपने मला शहाणपणा शिकवू नये

राजू शेट्टी आज पुण्यात (Raju Shetti Visit Pune) आले होते. त्यांनी साखर आयुक्तांबरोबर (Sugar Commissioner) भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) देखील टीका केली. ज्यांनी जात काढली त्यांच्याबरोबर शेट्टी जातात या भाजपच्या टिकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, सत्ता नसल्याने भाजपचे सगळे नेते (All BJP leaders) कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात (caste) काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दात राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भाजपवर (Bjp) निशाणा साधला.

निती आयोगाची (NITI Aayog) शिफारस मान्य नाही

निती आयोगाने (NITI Aayog) शेतकऱ्यांना ऊसाची किंमत तीन हप्त्यात द्यावी अशी शिफारस केली ती मान्य नाही. वेळ पडल्यास याविरोधात न्यायालयातही (Court) जाऊ. याविषयासंदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरु आहे. यात राजकारणाचा काहीही संबंध नसल्याचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी यावेळी सांगितले.

Web Title : Raju Shetti | there no time sign letter 12 mlas appointed governor legislative council raju shettys harsh word

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर