Raju Shetty | ठाकरे सरकारला मोठा झटका ! स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर, राजू शेट्टींची घोषणा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Raju Shetty | महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) आधीच कुरबुरी सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टींनी (Raju Shetty) महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे. गेले अनेक दिवस राजू शेट्टींनी याबाबतचा इशारा अनेकदा आपल्या वक्तव्यामधून दिला होता. अखेर आज त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. (Thackeray Government)

 

दिल्लीवाल्यांनी (Dehli) फसवलं, मुंबईवाल्यांनी (Mumbai) फसवलं. आम्हाला आता आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय. आता या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये निराश होऊन तडफडून मरण्यापेक्षा लढता लढता मरण्याचा निर्णय घेऊया, असं राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हटलं आहे.

 

महाराष्ट्रातल्या (Maharashtra) शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं.
साताऱ्यामधील (Satara) सभेत पवार यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार (Sharad Pawar) भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला.
तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते.
मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो आणि महाविकास आघाडीचे आणि आमचे संबंध सगळे संपलेले आहेत,
असं म्हणत राजू शेट्टींनी महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे.

 

दरम्यान, ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले.
मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील गेलं नाही.
एक रकमी एफआरपी (FRP) देणे शक्य नाही अशा समितीच्या अहवालावरून नीती आयोगाने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत निर्णय घेण्याचं सांगितलं. मात्र आयोगाच्या सूचनांपेक्षा सरकारने कडक भूमिका घेतली असल्याचं शेट्टी म्हणाले.

 

Web Title :- Raju Shetty | former mp raju shetty announced sepreation of swabhimani shetkari sangahatana from mahavikas aghadi government kolhapur rally

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा