भारत बंदच्या समर्थनार्थ कोल्हापूरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चा !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या भारत बंदचे परिणाम आता कोल्हापूरमध्येही दिसू लागले आहेत. कामगार संघटनांकडून आपल्या विविधी मागण्यांसाठी आणि काही गोष्टींचा निषेध नोंदवण्यासाठी आजच्या या बंदचं आयोजन करण्यात आलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत असल्याचं दिसत आहे. कोल्हापूरातील कामगार संघटना आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कामगार संघटनेचा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी पोलीस बंदोबस्तही पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर सांगली रस्त्यावरील टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केलं आहे. तब्बल अडीच किमी पर्यंत वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “गेल्या 6 वर्षात केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी धोरण राबवलं आहे त्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. याचा परिणाम म्हणजे देशाच्या उत्पन्नातील घटणारा शेती क्षेत्रातला हिस्सा आहे. हे क्षेत्र मागे पडत असल्याचा हा पुरावा आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतीमालाच्या आयात-निर्यातीबाबत सरकारचं कायमच धर-सोडीचं धोरण राहिलं आहे.”

पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “गरज होती तेव्हा सरकारने बघ्याची भूमिका घेतली आणि आता गरज नसताना तुर्कस्तानातून कांदा आयात केला जो कोणी घ्यायला तयार नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या कांद्याच्या दरावर झाला आहे.”

बेरोजगारी आणि कामगारांच्या मुद्द्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. औद्याोगिक प्रगती झालेली असतानाही या वसताहतीमधील छोटे छोटे उद्याोग बंद पडत आहेत. अनेकांनी टाळेबंदी केली आहे. नवीन रोजगार निर्माण करणं दूरच परंतु ग्रामीण भागातील मुलांच्या हाताला मिळणारं काम तेही हिरावून घेतलं गेलं आहे. या सगळ्याला आताची अर्थव्यवस्था जबाबदार आहे.” असे ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/