सुभाष देशमुख हे सहकार मंत्री नव्हे, स्थगिती मंत्री : राजू शेट्टी

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाईन – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीच्या कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. ही रक्कम दिली नाही तर संबंधित साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा कायदा आपल्याकडे आहे. असे असताना देखील राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख अशा प्रकारच्या कारवायांना स्थगिती देत शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. राज्याचे सहकार मंत्री हे सहकार मंत्री नसून स्थगिती मंत्री आहेत, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

परिस्थिती अशीच राहिल्यास निर्णय घेण्यास सक्षम : खडसे

दक्षिण सोलापूर तालुक्यातील डोमगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.खासदार राजू शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऊस उत्पादकांच्या समस्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांचा मेळावा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऊस उत्पादकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. याचबरोबर सहकार मंत्र्यांनी केलेल्या कारभाराची सुद्धा उत्तरे द्यावीत. सहकार मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या नावावर पैसे उचलून स्वतःचे कारखाने उभे केले.  तसेच बोगस प्रकल्प सादर करून दूध भुकटीचे ५ कोटींचे अनुदान लाटले आणि साखर कारखान्यांना वसुलीला स्थगिती देऊन शेतकरी विरोधी पाप केले. या तीनही प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि नंतर उसाच्या प्रश्नावर बोलावे, असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला.