Raju Shetty On Lok Sabha Elections | हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढवणार, राजू शेट्टींची घोषणा

 कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Raju Shetty On Lok Sabha Elections | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरणार असून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागेवा, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्या जागा लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन त्यांनी केले. शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे हे शिबीर पार पडले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, पोपट मोरे, शैलेश आडके, संदीप राजोबा आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, आम्ही मविआमधून बाहेर पडलो आहोत. भाजपमधून (BJP) या आधीच बाजूला झालो आहोत.
शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे.
रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे.
लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

 

शेट्टी पुढे म्हणाले, आम्ही मांडलेला हमीभावाचा कायदा अद्याप प्रलंबित आहे.
केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्य़ंत आमचा संघर्ष सुरुच राहिल.
शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहामध्ये चर्चा झालेली नाही.
त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे प्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- lok sabha elections will be fought on own workers should start preparations says raju shetty in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Industries Minister Uday Samant | नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण 15 दिवसात आणणार – मंत्री उदय सामंत

Pankaja Munde | “…मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?