Raju Shetty | ‘जाता जाता शेतकऱ्यांच्या ‘या’ 3 मागण्या पूर्ण करा, त्यांचा आशीर्वाद लागेल’ – राजू शेट्टींचा मविआ सरकारला खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raju Shetty | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 35 ते 40 आमदारांनी बंडाची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करत असातानाच शिंदे गट आपल्याच भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

 

राजू शेट्टी (Raju Shetty) आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “महाविकास आघाडीच्या नेत्यांनो आता तरी शहाणे व्हा. जाता जाता ऊसाची एकरकमी एफआपी व भूमी अधिग्रहणाचा कायदा पुर्ववत करा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा करा शेतकरी तुम्हाला दुवा देईल, याची तुम्हाला भविष्यात फार गरज आहे.” असं ते म्हणाले. तसेच, महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली बघून लोकशाहीवर प्रेम करणारा प्रत्येक माणसाच्या मनाला वेदना होत आहेत. अर्थात, राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’ असं देखील राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, नुकतेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.
मात्र, त्यांना पक्षांतर्गत कडाडून विरोध झाल्याने त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घेतले होते.
त्यांनी सध्या एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीवर चांगलेच नाराज आहेत.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाडिकांच्या विजयाने वेगळी राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत.
त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक-कोरे-आवाडे आणि शेट्टी अशी आघाडी आकाराला येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

Web Title :- Raju Shetty | raju shetty said to mva fulfill the three demands of the farmers they will be blessed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

 

Constipation | बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का?, मग या ३ पदार्थांपासून दूर राहा अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल!

 

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून मोठ्या कारवाईला सुरुवात