…तर कृषीमंत्रिपद राजू शेट्टी स्विकारणार ?, राज्यभर चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी अजूनही मंत्रिपदाचे वाटप झालेले नाही. असे असले तरी आपण महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहोत असे राजू शेट्टी यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून चर्चा आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्याचे नवे कृषिमंत्री होतील अशी शक्यता वर्तण्यात येत आहे. यावर राजू शेट्टींनी आज प्रतिक्रिया दिली.

राजू शेट्टी म्हणाले की समोरुन सन्मानजनक प्रस्ताव आला तर आपण नक्की राज्याचे कृषीमंत्री पद स्वीकारु आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू. महाविकासआघाडीत राजू शेट्टी यांचा पक्ष देखील सहभागी आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांचाही विचार केला जाऊ शकतो.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधींच्या भेटीला गेले होते. बाळासाहेब थोरात यांनी काल संध्याकाळी काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. ही भेट जवळपास 30 मिनिटे चालली यात विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे थोरातांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे देखील दिल्लीत गेले आहेत, ते देखील सोनिया गांधीची भेट घेणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत देखील दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार अशी चर्चा आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा असा या काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. आपल्या समर्थकांनी मंत्रिपद मिळवं यासाठी मागणी ते सोनिया गांधींकडे करणार आहेत.

Visit : policenama.com