राजू शेट्टी ‘बॅट’ घेऊन लोकसभेच्या मैदानात 

जयसिंगपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यंदा बॅट घेऊनच राजकीय मैदानात उतरणार आहेत. राजू शेट्टी यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले आहे.

शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून राजू शेट्टी यांचे नाव आहे. दुधाला दर मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभरात तीव्र आंदोलन केले होते. यंदाच्या निवडणुकीत शेतकरी वर्गाचा पाठिंबा शेट्टींना मिळणार असे बोलले जात आहे. स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. २०१४ च्या निवडणुकीत ते ‘शिट्टी’ हे चिन्ह घेऊन लढले होते आणि विजयी देखील झाले होते. पण येत्या लोकसभा निवडणुकीत मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला ‘बॅट’ हे चिन्ह अधिकृत केले असून खासदार राजू शेट्टी ‘बॅट’ हे चिन्ह घेऊनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत.

दरम्यान, ज्या ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी बॅट हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. नवीन चिन्ह मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. आता आगामी निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या ‘बॅट’चा राजकीय सिक्सर लागणार का ? हे येणारा काळच ठरवेल.

ह्याही बातम्या वाचा –

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !