Homeताज्या बातम्याRaju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, डॉक्टरांनी...

Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, डॉक्टरांनी दिली माहिती, जवळच्या मित्राने सांगितली स्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Raju Srivastava Health Update | रुग्णालयात असलेले राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाच कामी येईल, असे उत्तर डॉक्टरांनीही दिल्याचे बोलले जात आहे. अशावेळी राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित त्यांचे अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक मित्र अंधेरी पश्चिम येथे एकत्र बसून प्रार्थना करत आहेत. या मित्रांमध्ये कॉमेडियन एहसान कुरेशी, अशोक मिश्रा आणि त्यांचे बिझनेस मॅनेजर राजेश शर्मा यांचा समावेश आहे. एम्समध्ये राजू यांच्या अ‍ॅडमिशनवेळी राजेश शर्मा 6 दिवस दिल्लीत होते. आजही हे मित्र रात्री उशिरा दिल्लीला जाण्याच्या विचारात आहेत. (Raju Srivastava Health Update)

 

एहसान यांना आठवली शेवटची भेट

एहसान कुरेशी यांनी सांगितले की, मी त्यांना ओशिवरा पोलीस स्टेशनच्या समोरील ऑफिसमध्ये शेवटच्या वेळी भेटलो होतो. मॅरीगोल्ड बिल्डिंगमध्ये त्यांचे कार्यालय आहे. जेव्हा ते लखनऊला यायचे तेव्हा मित्रांसोबत कॉफी प्यायचे. मी, सुनील पाल यांनी मिळून त्यांच्याकडून चित्रपटांच्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती घेतली होती. आमच्यात अनेकदा असे संवाद व्हायचे. (Raju Srivastava Health Update)

एहसान यांनी सांगितले, त्यांच्या मुलीचे लग्न होणार आहे, मुलगा लहान आहे. फक्त इश्वाराने त्यांना पुन्हा एकदा उभे करू द्या, आम्ही मित्र मिळून ही प्रार्थना करत आहोत. ज्या माणसाने जगाला इतके हसवले आहे, संपूर्ण जग ते बरे होण्याची वाट पाहत आहे. आम्ही सर्व काळजीत आहोत आणि संध्याकाळपर्यंत दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहोत. राजू भाईंनी बरे होऊन परत यावे.

 

राजू यांचा कुटुंबावर खुप जीव

राजू यांच्या कुटुंबाचे वर्णन करताना, ईशान यांनी सांगितले, राजू हे त्यांच्या मुलांची खूप काळजी घेतात.
त्यांनी मुलांना चांगले संस्कार दिले आहेत. अंतरा 23 वर्षांची असून ती सहाय्यक दिग्दर्शनात आहे.
मुलगा आयुष्मान सध्या कॉलेजमध्ये शिकत आहे.

मुलाबाबत राजूभाई अनेकदा म्हणतात की यार, माझा मुलगा खूप सरळ आहे.
एकेकाळचा प्रसंग सांगताना राजू यांनी सांगितले होते की, त्यांनी आयुष्मानला समजावून सांगितले की, आता तुला घराचे बिल भरावे लागेल, कर्मचार्‍यांचे बिल द्यावे लागेल,
इतकी जबाबदारी तुला उचलावीच लागेल. हे पेमेंट कसे करायचे हे सर्व शिकावे लागेल.
आयुष्मान घाबरून म्हणला होता की पापा, मी हे सगळे कसे करणार.

त्यांनी आयुष्मानला समजावून सांगितले की, करावे लागेल, आम्हीही लहान होतो, तेव्हा घाबरायचो. त्यांचे कुटुंब मोठ्या दु:खात आहे, देवाने त्यांना शक्ती द्यावी.
वहिनीशीही बोलणे झाले होते, आता त्यांच्याशी मेसेजवर बोलणे होते.
त्या म्हणाल्या होत्या की, तुमच्या मित्रांच्या प्रार्थनेची गरज आहे, प्रार्थना करत राहा. प्रकृती सुधारत आहे.

 

कशी आहे राजू यांची तब्येत ?

राजू श्रीवास्तव यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की,
आज सकाळी डॉक्टरांनी राजू यांचा मेंदू काम करत नसल्याची माहिती दिली, मेंदू जवळपास डेडच्या स्थितीत आहे.
हृदयाचा त्रासही होत आहे. आम्ही सर्व त्रस्त आहोत. सर्वजण देवाची प्रार्थना करत आहेत. घरातील सदस्यांनाही काही समजत नाही.
प्रार्थना करा की राजू लवकर बरे व्हावेत आणि काही सकारात्मक प्रतिसाद द्यावा.

 

 

Web Title : –  Raju Srivastava Health Update | raju srivastava health update condition serious brain dead ehsaan qureshi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News