Rajya Sabha By-election | निवडणूक आयोगाची घोषणा ! राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rajya Sabha By-election | राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) याबाबत घोषणा केली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी ही पोटनिवडणूक (Rajya Sabha By-election) घेण्यात येणार आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान पार पडणार आहे. तर, निकाल याच दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजीच जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यसभेच्या घेण्यात येणार असलेल्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूकांमध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर यांच्यानंतर कोणाला ही जागा मिळणार? हा एक प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाचे दिग्गज खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळं निधन झालं. राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे आता गुजरात काँग्रेस प्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार याकडं देखील नेते मंडळींचं लक्ष लागुन आहे.

दरम्यान, नुकतंच राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमलं आहे.
पंरतु, आता राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुक घेण्यात येत आहे.
या पार्श्वभुमीवर राजीव सातव यांच्या जागेवर कुणाला पाठवणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

Web Titel :- Rajya Sabha By-election | eci announces rajya sabha by polls for maharashtra assam bengal puducherry tamil nadu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे