Rajya Sabha By-election | भाजपचा मोठा निर्णय ! काँग्रेसच्या विनंतीला मान देत भाजपची ‘या’ निवडणूकीतून माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइनRajya Sabha By-election | राज्यसभेच्या रिक्त जागेवर काॅग्रेसच्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनतर रजनी पाटील (Rajni Patil) यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात भाजपने संजय उपाध्याय यांना (sanjay upadhyay bjp) उभं केलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. यानंतर ही निवडणूक बिनविरोध (Rajya Sabha By-election) व्हावी यासाठी काॅग्रेसच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत विंनती केली. यानंतर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या विंनतीला मान देत भाजपने उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

काॅग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत खा. राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाने राज्यसभेची एक जागा रिक्त राहिली.
त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर केले.
यानंतर काॅग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून होते.
नंतर काॅग्रेसने रजनी पाटील (Rajni Patil) यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले.
याच्यांविरोधात भाजपनेही उमेदवारी दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्यास अडचण ठरत होती.

दरम्यान, काँग्रेसच्या (Congress) उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिेले होते.
दरम्यान, आता भाजपचे संजय उपाध्याय (sanjay upadhyay) उमेदवारी अर्ज माघारी घेणार आहेत.

 

Web Title : Rajya Sabha Byelection | bjp accept congress demand rajni patil rajya sabha byelection sanjay upadhyay

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thane Crime | ठाण्यातील पोलीस भरतीत गैरप्रकार ! 5 परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल; पुण्यातील एकाचा समावेश

NDA Cadet Dies in Pune | एनडीएमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे लष्कर न्यायालयाचे आदेश

Maruti Alto 800 झीरो डाऊन पेमेंटवर 90 हजारात खरेदी करा, कंपनी देईल वॉरंटीसह मनीबॅक गॅरंटी