राज्यसभेच्या ‘या’ ६ जागांसाठी ५ जुलैला होणार मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूका झाल्यानंतर आता राज्यसभेतील ६ जागांसाठी निवडणूका पार पडणार आहेत. लोकसभा निवडणूका लढण्यासाठी काही खासदारांनी राज्यसभेतील जागांचा राजीनामा दिला होता. त्याच ६ जागांसाठी या निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील १ जागा बिहार, २ जागा गुजरातसाठी आणि ३ जागा ओडिशासाठी असणार आहेत.

अशी पडेल निवडणूक पार –

बिहारमधून रविशंकर प्रसाद, गुजरात मधून अमित शाह आणि स्मृती ईराणी, ओडिशामधून अच्युत सामंत, प्रताप केसरी देव आणि सौम्यरंजन पटनायक यांनी राज्यसभा खासदार म्हणून राजीनामे दिले होते. कारण या सर्वांना लोकसभेच्या निवडणूका लढवायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी राज्यसभेतील राजीनामे दिले होते. या सगळ्या जागासाठी २५ जूनला राज्यसभेत नामांकन होणार आहे. तर या जागांसाठी ५ जुलैला सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित विधानसभामध्ये मतदान होणार आहे. यानंतर ५ जुलैला रात्री याचा निकाल समोर येईल.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद देखील बिहारमधून राज्यसभेचे खासदार होते. ही जागा त्यांच्यासाठी पटना साहिब मधून निवडणूक लढण्यासाठी सोडण्यात आली होती. काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात यांनी ही लोकसभा निवडणूक लढली होती त्यात रविशंकर प्रसाद यांचा विजय झाला. यात ते २ लाख ८४ हजार ६५७ मतांच्या फरकाने विजयी झाले.

सिनेजगत

चाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे चाहत्यांना ‘हे’ आवाहन

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…