Rajya Sabha Election 2022 | महाराष्ट्रातून राज्यसभेवर विनोद तावडे, पियुष गोयल?; भाजपच्या गोटात खलबतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपच्या (BJP) गोटातही खलबते सुरु झाले असून महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2022) केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

 

संख्याबळ पाहिले तर महाराष्ट्रातून भाजपला दोन उमेदवार स्वबळावर राज्यसभेवर पाठवता येतील. सध्या भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेत असून त्यापैकी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. गोयल राज्यसभेतील सत्तारूढ पक्षाचे नेतेसुद्धा आहेत. तर उर्वरित एका जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे (Dr. Vinaya Sahasrabuddhe) व डॉ. विकास महात्मे (Dr. Vikas Mahatme) यांना उमेदवारी पुन्हा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Rajya Sabha Election 2022)

 

मंत्रिपदाचा दर्जा असलेले भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्षपद डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडे आहे. डॉ. सहस्रबुद्धे व डॉ. महात्मे पहिल्यांदाच राज्यसभेत गेले आहेत. दोन्ही सदस्यांचा राज्यसभेतील सहभागही चांगला राहिला आहे. त्यामुळे भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नेमके कोणते समीकरण समोर येईल हे सांगणे कठीण झाले आहे. संभाजीराजेंना पाठिंबा दिला तर मराठा समाजाला पुन्हा भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर एखादे वेगळेच नाव भाजपमधून समोर येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Rajya Sabha Election 2022 | discussion of names of piyush goyal and vinod tawde for rajya sabha from bjp maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा