Rajya Sabha Election 2022 | गंभीर आजारी असणारे भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल; म्हणाले – ‘पक्षाला आज माझी गरज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या सहा जागांसाठी (Rajya Sabha Election 2022) आज मतदानाला सुरुवात झाली आहे. सहापैकी 5 जागेवरील उमेदवार सहज विजयी होणार आहेत, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) चुरस रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एक – एक मत महत्त्वाचे असल्यानं सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. अशातच पिंपरी – चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रुग्णवाहिकेतून (Ambulances) विधान भवनात दाखल झाले आहेत.

 

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रकृती ठीक असेल तरच या, असं सांगितलं होतं. आज पक्षाला गरज आहे. डॉक्टरांनीही प्रवास करु शकतात असे सांगितले आहे. त्यामुळेच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त आहेत.
असे असताना देखील पक्षाला आपली गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना 2 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) दोन्ही आमदार रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले आहेत.

 

Web Title :- rajya sabha election bjp mla laxman jagtap came in ambulance to vote for rajya sabha election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा