‘अमित शाह-स्मृति इराणी’ यांची सीट जिंकण्याची स्वप्न पाहणारी काँग्रेस N = [T / (S+1)] फॉर्मुल्यात ‘अडकली’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – अमित शहा आणि स्मृती इराणी लोकसभेवर निवडून गेल्यामुळे गुजरातमधील दोन राज्यसभेच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. दोन्ही जागेवर एकाच वेळी निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावली. आता दोन्ही जागेसाठी ५ जुलैला निवडणूक होईल. यामुळे या दोन्ही जागेपैकी एका जागेवर निवडून येण्याचा काँग्रेसचा प्लॅन धुळीला मिळाला आहे.

काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले होते की दोन जागांसाठी वेगवेगळ्या दिवशी निवडणुका घेणे संविधानाच्या विरुद्ध आहे. अमित शहा यांना निवडणुकीत विजय मिळाल्याचे प्रमाणपत्र २३ मेला मिळाले होते. तर स्मृती इराणी यांना विजयाचे प्रमाणपत्र २४ मेला मिळाले होते. याचाच आधार घेऊन निवडणूक आयोगाने या दोन जागेवरील निवडणूक वेगवेगळ्या दिवशी घेण्याचे ठरवले आहे.

कसे झाले काँग्रेसचे नुकसान
गुजरात विधानसभेची एकूण सदस्य संख्या १८२ आहे परंतु सध्या १७५ सदस्यच आहेत. यामध्ये भाजपकडे १०० आणि काँग्रेस जवळ ७१ जागा आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी आता सदस्य दोन जागेसाठी वेगवेगळ्या २ बॅलेट पेपरने मतदान करतील. उमेदवाराला जिंकण्यासाठी ८८ मतांची गरज आहे. परंतु काँग्रेसच्या जवळ ७१ सदस्य आहेत. यामुळे काँग्रेसला एकही जागा जिंकता येणार नाही.

वेगवेगळ्या दिवशी निवडणूक घेतल्यामुळे काँग्रेसला फटका
राज्यसभेची निवडणूक N= [T/(S+1)] +1 या सूत्रानुसार होते. येथे N म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागा. T म्हणजे एकूण मतदारांची संख्या. S म्हणजे राज्यसभेच्या रिकाम्या जागा. N= [१७५/(२+१)] +१ = ५९. ३३ या सूत्रानुसार राज्यसभेच्या एका जागेवर निवडून येण्यासाठी ६० जागांची गरज भासेल. यामुळे काँग्रेसचा एक सदस्य राज्यसभेवर सहज निवडून आला असता. म्हणजे दोन्ही जागेसाठी एकाच वेळी निवडणूक झाली असती तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला असता. परंतु आता दोन्ही जागेसाठी वेग वेगळी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी निवडून येण्याकरिता ८८ मतांची गरज लागेल.

आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे