Rajya Sabha Election | ‘…तर राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि ती जिंकूही’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election | राज्यसभेच्या निवडणुकीवरुन (Rajya Sabha Election) महाराष्ट्रात राजकीय शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेने (Shivsena) राज्यसभेची 6 वी जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसरीकडे भाजपही (BJP) लढण्याचा प्लॅन आखण्यास सुरूवात करत आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि ती जिंकूही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत पाटील यांनी पत्रकाद्वारे सांगितलं आहे.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ”भाजपचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता राज्यसभा निवडणुकीत भाजपचे 2 उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरीक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सुचनेनुसार पुढील कारवाई होईल,” असं ते म्हणाले. (Rajya Sabha Election)

 

”राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेनं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे.
परंतू राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे 2 उमेदवार
लढवण्याच्या प्रयत्नात कधी-कधी मूळ उमेदवार पराभूत होतो,” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

अनिल परबांवरील कारवाईवर पाटील म्हणाले…

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर ईडीने (ED) केलेल्या
कारवाईबद्दल देखील चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले.
त्यावेळी ते म्हणाले की, ‘केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत.
त्याविषयी मी काही बोलणार नसल्याच,’ त्यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Rajya Sabha Election | if the senior leader of party orders we will fight for the third seat in the rajya sabha says bjp leader chandrakant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा