Rajya Sabha Election Results | राज्यसभेच्या निकालावरून संभाजीराजेंच्या समर्थकांचा शिवसेनेला जोरदार टोला; म्हणाले – ‘आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणुकीमध्ये (Rajya Sabha Election Results) कोल्हापुरातील धनंजय महाडिक (BJP Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला असून शिवसेनेचे संजय पवार (Shivsena Sanjay Pawar) पराभूत झाले आहेत. यामुळे शिवसेनेसह आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या समर्थकांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे. ‘शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. वाचाळवीर संजय राऊत आता कसं वाटतंय गार गार वाटतंय,’ अशा शब्दात ‘छावा’चे प्रमुख धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी ट्विटरवरून टीका केली आहे.

 

धनंजय जाधव म्हणाले, “शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. संजय राऊत आता कसं वाटतयं… गार गार वाटतयं. संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला सांगणारे मागील तीस वर्षांपासून शिवबंधन बांधलेल्या कार्यकर्त्याला निवडून आणू शकलेले नाहीत. छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेने बिनशर्त खासदार करावं अशी अनेक आमदारांची सुप्त इच्छा होती. परंतु शिवसेनेने शब्द फिरवल्याने आणि नाहक अटी, शर्ती घातल्याने ते शक्य झाले नाही.”

दरम्यान, पण छत्रपती घराण्याचा अपमान सहन न झालेल्या आमदारांनी शिवसेना, वाचाळवीर संजय राऊत आणि महाविकासघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
संभाजीराजेंना जर अपक्ष परंतु पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती”.
‘पक्षाच्या नावात “शिव” वापरुन रॉयल्टी खाल्ली. आता शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची
‘रॉयल्टी’ खाऊ देणार नाही”, असं राजे समर्थक छावाचे प्रमुख धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Rajya Sabha Election Results | rajyasabha election shivsena dhananjay mahadik wins sanjay pawar loose. Sambhaji raje supporter Dhananjay Jadhav on shivsena and mp sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा