Rajya Sabha Election Results | “निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती” – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election Results) भाजपचा (BJP) मोठा प्लॅन सक्सेस झाला आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. कोल्हापूरचे धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) बाजी मारली आहे. तर शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला आहे. पवार यांच्या पराभवामुळे आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि खरंतर शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. सहाव्या जागेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही अखेर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला. यामध्ये महाविकास आघाडीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखे दिग्गज समोर असतानाही देवेंद्र फडणवीसांनी अचूक रणनीती आखली आणि विजय खेचून आणला. दरम्यान, शनिवारी तीन साडेतीन वाजताच्या दरम्यान निकाल लागताच त्यामध्ये धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यानंतर फडणवीस यांनी 3 वाजून 55 मिनिटांनी एक ट्वीट केलं आहे. “निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती.. जय महाराष्ट्र !,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रातील जनतेने 2019 साली भाजपला जनमत दिले होते. मात्र, आमच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडीने ते काढून घेतले. मात्र, अशाप्रकारे स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते, हे आजच्या विजयाने स्पष्ट झाल्याचे,” फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Rajya Sabha Election Results | “The election was fought not just to fight, but to win” – Devendra Fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा