8 राज्यातील 19 राज्यसभेच्या जागांचे आले निकाल, जाणून घ्या कोणत्या जागी कोणी मारली बाजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी देशातील आठ राज्यांमधील राज्यसभेच्या 19 जागांवर मतदान झाले. मतदानानंतर आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. काही राज्यांमधून निकालही येऊ लागला आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तीन जागांपैकी दोन जागा भाजपाच्या खात्यात गेल्या आहेत, तर एक कॉंग्रेसने ताब्यात घेतली आहे. मध्य प्रदेशातून भाजपाचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुमेरसिंग सोलंकी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह देखील विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशमधील तीन जागांपैकी भाजपाने दोन आणि कॉंग्रेसने एक जागा जिंकली आहे. भाजपाचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांना 56 आणि सुमेरसिंग सोलंकी यांना 55 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांना 57 मते मिळाली. त्याचवेळी कॉंग्रेसचे दुसरे उमेदवार फूलसिंह बरैया यांना केवळ 36 मते मिळाली. तर मध्यप्रदेशात 2 मते नाकारली गेली.

सिधियांनीं मानले पंतप्रधान मोदींचे आभार
राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपच्या नेतृत्वाचे आभार मानत एक व्हिडिओ संदेश जारी केला. सिंधिया म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठित आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यांचे मनापासून आभार. आपण मला माझ्या राज्यामधून राज्यसभेवर निवडून देण्याची जी जबाबदारी दिली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहराज्यमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सशक्त नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमवेत मध्य प्रदेशच्या प्रगती आणि विकासासाठी पूर्ण क्षमतेने पार पाडेल. सिंधिया व्हिडीओ मेसेजमध्ये पुढे म्हणाले कि, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार. कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे मी तुमच्यापुढे हजर होऊ शकलो नाही, परंतु लवकरच मी तुमच्यामध्ये राहील. आपण सर्वानी सुरक्षित रहावे, आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवावे. जय हिंद ” राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांचे तोंड गोड केले. दिग्विजय यांनी कमलनाथला लाडू खाऊ घातले, तर कमलनाथ यांनीही त्यांचे तोंड गोड केले.

गुजरात भाजप अध्यक्षांनी तीन जागा जिंकण्याचे दिले संकेत
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी राज्यसभेत तीन जागा जिंकण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एक ट्विट केले असून त्यात तीन कमळांची फुले दिसत आहेत. आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी होत असल्याचे याद्वारे त्यांनी सूचित केले. मात्र, कॉंग्रेसने दोन मतांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे संपर्क साधल्याने मतमोजणी अजूनही बाकी आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचा आक्षेप रद्द केल्यानंतर पक्षाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला आहे. यापूर्वी कॉंग्रेसने गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करताना भाजपच्या दोन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने म्हटले होते की कॉंग्रेसने आक्षेप घेण्यास उशीर केला, कारण त्यांनी मतदानाच्या वेळीच आपला आक्षेप नोंदवायला हवा होता.

मिझोरममध्ये एमएनएफचा उमेदवार विजयी
मिझोरमच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या मतदानामध्ये एमएनएफचे उमेदवार पु. के. वानलालवेना विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाने वानलालवेना यांना विजयी घोषित केले आहे. ही राज्यातील 9 वी राज्यसभा निवडणूक आहे.

झारखंडमध्येही भाजपाने एक जागा जिंकली
झारखंडमधील दोन जागांवर झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. जेएमएम आणि भाजपने प्रत्येकी एक जागा सहज जिंकली आहे. जेएमएमचे उमेदवार सिबू सोरेन यांना 30 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार दीपक प्रकाश यांना 31 मते मिळाली. कॉंग्रेसच्या उमेदवाराला 18 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

आंध्र प्रदेशातील चारही जागांवर वायएसआरचा ताबा
आंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी राज्यसभेच्या चारही जागा जिंकल्या आहेत. परिमल नथवाणी यांचे नावही विजेत्यांमध्ये समाविष्ट आहे.

राजस्थानमधून कॉंग्रेससाठी चांगली बातमी
राजस्थानमध्ये राज्यसभेच्या रिक्त जागांवर मतदान झाले. त्यापैकी कॉंग्रेसने दोन जागा जिंकल्या तर एक जागा भाजपाच्या खात्यात गेली. भाजपचे उमेदवार राजेंद्र गहलोत यांना 54 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे उमेदवार केसी वेणुगोपाल यांना 64 आणि नीरज डांगी यांना 59 मते मिळाली. त्याचवेळी भाजपचे 1 मते नाकारण्यात आले.

मेघालयातून आला पहिला निकाल
सर्वात आधी मेघालयातून निवडणुकीचा निकाल लागला. तेथे नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) राज्यसभेची जागा जिंकली. सत्ताधारी एनपीपीचे उमेदवार डॉ. डब्ल्यूआर आर खारुली यांनी कॉंग्रेसच्या केनेडी खैरेमचा पराभव करून निवडणूक जिंकली. एनपीपी उमेदवाराला 39 मते मिळाली तर कॉंग्रेसच्या उमेदवाराला केवळ 19 मते मिळाली. मेघालयात 1 मते अवैध ठरविण्यात आली आहेत.

राजस्थानमध्ये दोन आमदारांनी केले नाही मतदान
राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान दोन आमदार वगळता इतर सर्वांनी मतदान केले. माहितीनुसार माकपचे आमदार गिरधारी माहिया अस्वस्थतेमुळे मत देण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्याचबरोबर मंत्री भंवरलाल मेघवाल हे देखील गुरुग्राममधील रूग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे त्यांनाही मतदान करता आले नाही. राजस्थानमधील 200 पैकी 198 आमदारांनी मतदान केले.

या 8 राज्यांच्या 19 जागांवर घेण्यात आल्या निवडणुका
शुक्रवारी मध्यप्रदेशाच्या 3, गुजरातमधील 4, राजस्थानमधील 3, आंध्र प्रदेशातील 4, झारखंडमधील 2 जागांवर मतदान झाले. याशिवाय ईशान्येकडील मणिपूर, मेघालय आणि मिझोरममधील राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले.

कॉंग्रेस आणि भाजपमधील चेकमेट
कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात राज्यसभा निवडणुकीत चेकमेटचा खेळ सुरूच आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातचे समीकरण भाजपने खराब केले असेल तर कॉंग्रेसने मणिपूरमध्ये भाजपला गोंधळात पडले आहे. झारखंडचे समीकरणही भाजपच्या बाजूने जाताना दिसत आहे, तर राजस्थानमध्ये दोन्ही पक्ष क्रॉस वोटिंगची अपेक्षा करीत आहेत.