रामदास आठवलेंना कदाचित उमेदवारी मिळेल, संजय काकडेंचा ‘अंदाज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा येत्या 2 एप्रिल रोजी रिक्त होणार आहेत. रिक्त होणाऱ्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी प्रत्येक पक्षातील इच्छूकांकडून प्रयत्न करत आहेत. राज्यसभा उमेदवारीवरून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना टोले लगावणारे संजय काकडे यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्या उमेदवारीवरही भाष्य केले आहे. आठवले यांना कदाचित पुन्हा उमेदवारी मिळेल, असा अंदाज काकडे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार असल्याने या जागेवर वर्णी लागावी यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नावं निश्चित झाल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले. उदयनराजे पक्षात आले आणि निवडणूक हरले, तिथच त्यांचा विषय संपला आहे, असे काकडे यांनी सांगितले.

आठवले यांना मात्र राज्यसभेचे तिकीट मिळू शकतं, असा अंदाज काकडे यांनी व्यक्त केला आहे. रामदास आठवले केंद्रात सध्या राज्यमंत्री आहेत. त्यांचा पक्ष 2012 पासून भाजपच्या सोबत आहे. त्यांच्या पक्षाने 2014 पासून महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे कदाचित पक्षाकडून त्यांचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो, असे संजय काकडे यांनी म्हटले आहे.

You might also like