Rajya Sabha Elections 2022 | कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2022) विधानभवनात मतदानाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपचे (BJP) प्रत्येकी 20 तर काँग्रेसच्या 10 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रायडंट हॉटेलमधून शिवसेनेचे (Shivsena) आमदारही मतदानासाठी विधानभवनात पोहोचले आहे. सध्याची निवडणूक चुरशीची सूरू आहे. निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, प्रकृती बरी नसतानाही काही आमदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात (Vidhan Bhavan) दाखल झाले आहेत.

 

भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) या कर्करोगाशी झुंज देत आहेत. मात्र तरीही त्या रुग्णवाहिकेतून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात दाखल झाल्या आहेत. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) हे देखील गंभीर आजाराने त्रस्त आहेत. तेही मतदानासाठी रुग्णवाहिकेतून येत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूकडून आमदार रिंगणाबाहेर राहू नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. लक्ष्मण जगताप आधी एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं पुण्याहून मुंबईत पोहोचणार होते. मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यांना उशीर होणार होता. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर लक्ष्मण जगताप पिंपरी ते मुंबई असा अ‍ॅम्ब्युलन्समधून प्रवास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Rajya Sabha Elections 2022)

मिळालेल्या माहितीनुसार, मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दीड तासांमध्ये जवळपास 50 टक्के मतदान पूर्ण झाले असल्याचे समजते.
तर राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik)
यांच्या मतदानावरील याचिकेवर उच्च न्यायालयात (High Court) निर्णय झाल्यानंतर तेही मतदान करणार असल्याचं समोर येत आहे.
त्यामुळे या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे.
निकालानंतरच राष्ट्रवादीकडून पुढील रणनिती आखली जाईल आणि त्यानुसारच उर्वरित आमदार मतदान करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title :- Rajya Sabha Elections 2022 | rajya sabha election 2022 bjp mla mukta tilak battling with cancer reached vidhan bhavan by ambulance for voting marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajya Sabha Election 2022 | ‘महाविकास आघाडीतला एक ‘संजय’ जाणार’ – भाजपा नेत्याचं मोठं विधान

 

Bombay High Court-Nagpur Bench | ‘प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे’ – उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

 

Maharashtra School Start | चला प्तर भरा ! शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून तर शाळा 15 जूनला सुरू होणार