Rajya Sabha Elections-2022 | महाराष्ट्रातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर; जाणून घ्या मतदानाची तारीख

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rajya Sabha Elections-2022 | महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Elections-2022) जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील सहा खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून निवडणूक लागली आहे. यामुळे 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तसेच 10 जून रोजी मतदान होणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.

 

राज्यसभेसाठी 15 राज्यातील 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आगामी जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने राज्यसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीने राज्यसभेतील अनेक समीकरणे बदलणार असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील या 6 खासदारांपैकी कोण निवडून येणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

 

महाराष्ट्रातील ‘या’ 6 खासदारांचा कार्यकाळ संपला –

1. विनय सहस्त्रबुद्धे (भाजप)

2. पीयुष गोयल (भाजप)

3. विकास महात्मे (भाजप)

4. संजय राऊत (शिवसेना)

5. प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी)

6. पी. चिदंबरम (काँग्रेस)

 

Web Title :- Rajya Sabha Elections-2022 | rajya sabha elections announced for six seats in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा