अमर सिंह म्हणाले – ‘जीवन आणि मृत्यूच्या दरम्यानची झुंज सुरू, अमिताभ बच्चन बद्दलच्या गोष्टींबाबत दुःख’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी मंगळवारी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटूंबाकडून देण्यात आलेल्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. सिंह यांनी एक ट्विट करत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या.

मंगळवारी 18 फेब्रुवारीला अमर सिंह यांचे वडील हरिशचंद्र सिंह यांची पुण्यतिथी आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांना संदेश पाठवला यावर अमर सिंह यानी ट्विट केले की आज माझ्या वडीलांची पुण्यतिथी आहे आणि मला यासंबंधित अमिताभ बच्चन यांच्याकडून संदेश मिळाला आहे. जेव्हा मी जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहे, अशा वेळी मी अमिताभजी आणि त्यांच्या कुटूंबासंबंधित करण्यात आलेले वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त करत आहे, देवाने त्या सर्वांना आशिर्वाद द्यावा.

मागील काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे जवळचे मित्र अमर सिंह त्यांचे टीकाकार बनले होते. अमर सिंह यांनी 2018 साली सांगितले होते की, अमिताभ बच्चन यांनी एका पार्टीत खुलासा करत एका मोठ्या व्यक्तीबद्दल सांगितले होते की ते त्यांना पैसे देऊ इच्छित आहेत परंतु त्यांनी ते घेतले नाही, परंतु हे खोटे आहे. अमिताभ या व्यक्तीकडून 250 कोटी रुपये मागत होते तर ते त्यांना 25 कोटी रुपये देऊ इच्छित होते. जर अमिताभ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगावे. नाहीतर मी त्या व्यक्तीचे पत्र दाखवेल, ज्यात 25 कोटी रुपये देण्याचे बोलले आहे. माझ्याकडे बँकेंचे अनेक पुरावे आहेत ज्यात त्यात अमिताभ यांनी कोट्यावधी रुपये घेतले. 100 कोटी रुपये तर त्यांनी अजूनही परत केले नाही. माझ्याकडील पुरावे अमिताभ यांना एक्सपोज करेल.

राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्यावर निशाणा साधत अमर सिंह म्हणाले होते की, जया बच्चन त्यांच्या पतीना समजावत का नाही जुम्मा चूम्मा करु नका. तुम्ही अमिताभ बच्चन यांना का समजावले नाही की पावसात भिजणाऱ्या अभिनेत्रींसह असे दृश्य देणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या सुनेला ऐश्वर्याला का समजावले नाही की ऐ दिल है मुश्किल मध्ये जो किसिंग सीन ऐश्वर्याने दिला होता तो द्यायला नको होता. तुम्ही तुमच्या कुटूंबातील सदस्यांना का सांगितले नाही की पडद्यावर असे सीन द्यायला नको होते.

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन –
जुलै 2019 मध्ये राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या होत्या की निर्भयांच्या दोषींना अद्याप शिक्षा मिळाली नाही. निर्भयांची आई अद्यापही असहाय समजते. ते म्हणाले की पहिल्यांदा आई वडील मुलींसाठी घाबरत होत्या परंतु आता मुलीच नाही तर मुले देखील सुरक्षित नाहीत.

सदनात लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांच्या संरक्षणासाठी पॉक्सो विधेयक पारित होणार होते. या संशोधनात मंत्रालयाने यात फोटो, डिजिटल आणि कंप्युटर पॉर्नोग्राफिक संबंधित बाबींची परिभाषा दिली होती. या दरम्यान एका चर्चेत जया म्हणाल्या की, आपण टीव्ही आणि सिनेमा रोखू शकत नाही परंतु स्वत:ला रोखू शकतो. त्यांच्या या मुद्यावर अमर सिंह त्यांच्यावर भडकले होते आणि त्यांच्या बच्चन कुटूंबाला घेरण्याचा प्रयत्न केला होता.