राज्यसभेत ‘गदारोळ’ सुरू असताना शेतकऱ्यांशी संबंधित 2 ‘विधेयके’ मंजूर, कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लोकसभेनंतर राज्यसभेत देखील विरोधकांच्या सततच्या विरोधादरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयक मंजूर करण्यात आली आहेत. ही विधेयके म्हणजे शेतकरी व्यापार व वाणिज्य (संवर्धन आणि सरलीकरण) विधेयक 2020, शेतकर्‍यांचे (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवांवरील कर विधेयक 2020 हे आहेत. दरम्यान, विरोधी पक्षातील खासदारांनी वेल ऑफ हाऊसमध्ये घोषणाबाजी केली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी त्यांना आपल्या जागांवर परत येण्यास सांगितले. कृषी विधेयकांविरोधात सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

घोषणाबाजी करीत विरोधी पक्षांचे खासदार उपसभापतींच्या आसनापर्यंत पोहोचले. केंद्रीय कृषी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर त्यावेळी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. गोंधळामुळे राज्यसभेची कारवाई काही काळ खंडित झाली होती.

यापूर्वी वरच्या सभागृहात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी चर्चेसाठी आणलेल्या दोन महत्त्वाच्या विधेयकांचा विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र विरोध दर्शविला आणि दोन्ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातील आणि कॉर्पोरेटच्या हिताच्या दिशेने असल्याचे म्हटले. दरम्यान दोन्ही विधेयकांना लोकसभेची मान्यता मिळाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like