राज्यसभेत सुरक्षा सुधारणा विधेयक (SPG) मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत सुरक्षा सुधारणा विधेयक (SPG) मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला. हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडले. काँग्रेसच्या विरोधानंतरही लोकसभेनंतर राज्यसभेतही आवाजी मतदानाने एसपीजी विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्याने यापुढे केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. तर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नसल्याचे विधेयकामुळे स्पष्ट होते.

केंद्र सरकारने गांधी घराण्याची सुरक्षा हटविल्यानंतर मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यापूर्वी लोकसभेत सुरक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाले होते. ते आज राज्यसभेतही मांडण्यात आले. या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. काँग्रसने आक्षेप घेतला होता. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी गांधी घराण्यावर टीका केली. हे विधेयक एका कुटुंबाच्या हितासाठी आणले नाही, असे शहा म्हणाले. तसेच गांधी कुटुंबीयांची सुरक्षा काढण्यात आलेली नसून ती बदलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान नरसिंह राव, चंद्रशेखर, आय.के. गुजराल, मनमोहन सिंग यांचे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे एसपीजी कव्हर देखील मागे घेण्यात आले आहे. लोकशाहीमध्ये कायदा प्रत्येकासाठी समान असतो, असे अमित शहा यांनी सांगितले.

Visit : policenama.com

Loading...
You might also like