डॉक्टरांच्या प्रचंड विरोधानंतरही ‘नॅशनल मेडिकल कमिशन बिल’ पास, वैद्यकीय क्षेत्रात ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल मेडिकल कमिशन बिल २०१९ (NMC) आज राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकास २९ जुलै रोजी लोकसभेत मंजुरी मिळाली होती. देशातील डॉक्टर आणि वैद्यकीय संघटनांच्या प्रखर विरोधानंतर देखील सरकारने हे विधेयक मंजूर केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ने म्हटले आहे की ,’या विधेयकाच्या कलम ३२ नुसार देशातील ३.५ लाख अपात्र डॉक्टरांना आणि वैद्यकीय व्यावसायिकांना अ‍ॅडव्हान्स मेडिकल प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाणार आहे.’

त्यांनी पुढे म्हटले की,’ या निर्णयाचा अर्थ असा होतो की आता सर्व प्रकारचे पॅरामेडिकल लोक म्हणजेच फार्मासिस्ट, नर्स, फिजियोथेरेपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट इत्यादि आधुनिक चिकित्सा पद्धतिचा उपयोग करण्याबरोबरच स्वतंत्रपणे औषधे सुद्धा देऊ शकणार आहेत. त्यांनी असे करणे कायद्याने वैध मानले जाईल.’ दुसरीकडे डॉक्टर्स असोसिएशनने म्हटले आहे की असे झाल्यास वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचा दर्जा खालावण्याबरोबरच आरोग्यसेवांमध्ये देखील घेत होईल. या बिलाच्या विरोधात फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स एसोसिएशन (एफओआरडीए), रेजिडेंट डॉक्टर्स एसोसिएशन (आरडीए) सहित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) यांनी आपल्या सदस्यांना काळे बॅच लावून काम करण्यास सांगितले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन ने म्हटले आहे की या विधेयकामुळे वैद्यकीय शिक्षण महाग होईल आणि मेडिकल कॉलेज चे मॅनेजमेंट ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागांना जास्तीच्या दराने विकू शकतील. यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा बाजार होण्याची भीती वैद्यकीय संघटनांनी व्यक्त केली आहे. या नवीन विधेयकानुसार आता संपूर्ण देशात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी केवळ एकच नीट परीक्षा होणार आहे.

वैद्यकीय सल्लागार समितीची होणार स्थापना :

याशिवाय वैद्यकीय सल्लागार (मेडिकल अ‍ॅडवाइजरी काउंसिल ) समिती देखील बनवली जाणार आहे जी वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संदर्भातील राज्यांच्या समस्या आणि सल्ल्यांवर काम करणार आहे. याचबरोबर मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया बरखास्त करण्यात येणार आहे. तसेच त्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवादेखील समाप्त केली जाणार आहे. परंतु त्यांना ३ महिन्यांचे वेतन आणि भत्ते दिले जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांना मेडिकल प्रॅक्टिस करण्यासाठी एक चाचणी द्यावी लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –