राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक, भाजपाला 12-13 जागांवर विजयाची ‘अपेक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेच्या ५५ रिक्त जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार असून, १२ ते १३ जागा ह्या भाजप जिंकू शकते. जर भाजपाने १२ ते १३ जागा जिंकल्या तर भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ हे ९४ ते ९५ च्या घरात पोहोचणार आहे. पुढची निवडणूक ही नोव्हेंबर मध्ये उत्तर प्रदेश येथे होणार असून, भाजपला तिथेही काही जागा जिंकण्याची आशा आहे. एवढ्या जागा जिंकल्या तरीही, भाजप राज्यसभेत बहुमताजवळ पोहचू शकत नाही.

या निवडणुकीत डीएमके आणि एआईएडीएमके प्रत्येकी ३ जागा जिंकू शकते. जेडीयू, बीजेडी आणि आरजेडी सुद्धा प्रत्येकी २-२ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. टीएमसी ला ५ जागा मिळू शकतात तर, वाईएसआरसीपी आणि टीआरएस ला अनुक्रमे ४ आणि १ अशा जागा मिळतील. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये राज्यसभेच्या जास्त जागा आहेत. परंतु या तिन्ही राज्यात सत्ता नसल्यामुळे २०२२ मध्ये भाजपला येथून जास्त जागा जिंकण्याशी आशा नाही. तिन्ही राज्यांतून भाजपाकडे सध्या २१ खासदार असून २०२२ मध्ये यांची संख्या निम्मी होईल.

६ मार्च ला निवडनुकीबाबत अधिसूचना जाहीर केली जाईल. नामांकन भरण्यासाठी १३ मार्च ही शेवटची तारीख आहे. २६ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. ५ वाजता मतमोजणी होणार आहे.

या 55 जागांपैकी महाराष्ट्र-७, ओडिशा-४, तमिळनाडू-५, पश्चिम बंगाल-५, आंध्र प्रदेश-४, तेलंगणा-२, आसाम-३, बिहार-५, छत्तीसगड-२, गुजरात-४, हरियाणा-२, हिमाचल प्रदेश-१, झारखंड-२, मध्य प्रदेश-३ , मणिपूर-१, राजस्थान-३ आणि १ ही मेघालयातील आहे.