‘काँग्रेसनंतर आता ‘समाजवादी’ला खिंडार, खा.सुरेंद्र सिंह नागर यांचा ‘राजीनामा’, भाजप प्रवेशाची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक राजकीय पक्षातील नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु असून ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेसनंतर आता समाजवादी पक्षाला देखील याचा झटका मिळाला आहे. नीरज शेखर यांच्यानंतर आता समाजवादी पक्षाचे खासदार सुरेंद्र सिंह नागर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभा सभापतींनी स्वीकार केला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सपाचे खासदार सुरेंद्र नागर यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांची भेट घेतली, नागर हे पश्चिम उत्तर प्रदेशमधील गुजर नेता आहेत. राज्यसभेचे खासदार असलेल्या सुरेंद्र नागर यांचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला आहे. राज्यसभेचे प्रतिनिधित्व करणारे सुरेंद्र नागर यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ जुलै २०२२ पर्यंत होता.

भाजपमध्ये सध्या विरोधी पक्षातील नेते प्रवेश करत आहेत, याआधी देखील उत्तर प्रदेशमधील २ मोठ्या नेत्यांनी राज्यसभेतून राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय तेलुगू देसम पक्षाच्या ४ सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे प्रतिष्ठीत नेता संजय सिंह आणि समाजवादी पार्टीचे नीरज शेखर यांनी देखील राज्यसभेतील आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. नीरज शेखर पूर्व पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आहेत.

आरोग्यविषयक वृत्त