Rajya Sabha Election 2022 | ठाकरे सरकारला मोठा झटका ! अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ED चा विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असल्याचं दिसत आहे. असं असतानाच आता ठाकरे सरकारची (Thackeray Government) चिंता अधिक वाढली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडीच्या अटकेत आहेत. राज्यसभेसाठी मतदान करण्याकरीता परवानगीसाठी यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) विरोध दर्शविला आहे.

 

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या कडून मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए न्यायालयात (Special PMLA Court) 4 जून रोजी अर्ज केला होता. ज्यावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान ईडीने विरोध दर्शविल्यामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. (Rajya Sabha Election 2022)

दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अधिक चुरशीचं मतदान होणार आहे. हे स्पष्ट झालं आहे.
भाजप आणि शिवसेना आमने-सामने असल्याने सहाव्या जागेसाठी मैदान कोण मारणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
या निवडणुकीसाठी एक-एक मताला महत्त्व आलं आहे. भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
भाजपला दोन जागा मिळणं निश्चित आहे. पण भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत.

 

Web Title :- Rajyasabha Election 2022 | why shivsena mla put in hotel before rajyasabha election 2022 sanjay raut says reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap On Police Sub Inspector | आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) 3 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

Pradip Bhide Passes Away | दूरदर्शनचा चेहरा ‘हरपला’ ! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याचं 65 व्या वर्षी निधन

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या