राज्यसभेतील ‘मार्शल’ चा ड्रेस बदलला, आता सैन्याप्रमाणे ‘युनिफॉर्म’ परिधान करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेचे हिवाळी अधिवेशन अर्थात हिवाळी अधिवेशन आज (18 नोव्हेंबर 2019) सुरू झाले. राज्यसभेचे हे 250 वे अधिवेशन आहे. या निमित्ताने राज्यसभेत एक नवीन बदल पाहायला मिळाला. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू जेव्हा सभागृहात आले, तेव्हा त्यांच्यासमवेत उभे असलेल्या मार्शलचा युनिफॉर्म बदललेला दिसला .

संसदेच्या मार्शल यांचा युनिफॉर्म यापूर्वी पांढऱ्या रंगाचा होता. जो आता लष्कराच्या अधिकाऱ्यांप्रमाणे बदलला आहे. सदनाची कार्यवाही सुरू होताच तेथे उपस्थित सर्व खासदार मार्शलचा बदललेला युनिफॉर्म पाहून आश्चर्यचकित झाले.

नवीन ड्रेस हा सैन्याच्या युनिफॉर्म सारखा
संसद मार्शलचा ड्रेस सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्म सारखाच आहे. त्याचा रंगही बदलला आहे. त्याचा रंग ऑलिव्ह ग्रीन आहे. आता त्यांना पगडीऐवजी टोपी घालाव्या लागतील.

राज्यसभेचे 250 वे अधिवेशन, सभागृहात 245 सदस्य
राज्यसभेचे हे 250 वे अधिवेशन आहे. या सभागृहात 245 सभासद आहेत. 1952 मध्ये त्याची स्थापना झाली.

मोदींचे सर्व पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन
26 नोव्हेंबर रोजी राज्यघटनेला 70 वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने संयुक्त अधिवेशन बोलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Visit : Policenama.com