Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली; 3 ’एम’ बद्दल कोणीही अचूक भाकीत करू शकत नाही

नवी दिल्ली : Rakesh Jhunjhunwala | ही गोष्ट 6 महिन्यांपूर्वीची आहे. दिल्ली ’द कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’चा (The Confederation of Indian Industry) कार्यक्रम होता. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी तात्विक शैलीत 3 ’एम’ ची भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते, तीन ’एम’ बद्दल कोणीही अचूक भाकीत करू शकत नाही. मौसम (Weather), मौत (Death) आणि मार्केट (Market) हे ते तीन ’एम’ आहेत. काल अचानक राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी आली आणि या दिग्गज गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी स्वतःची केलेली भविष्यवाणी खरी करून सर्वांना भावूक केले आहे.

 

मौसम, मौत, मार्केट आणि महिला… यांच्याबद्दल काहीही सांगणे कठीण

 

या वर्षी फेब्रुवारीमध्ये राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी सीआयआयच्या एका कार्यक्रमात म्हटले होते की, मौसम, मौत आणि मार्केटचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. हवामान केव्हा बदलेल, मरण कधी येईल आणि बाजार कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. तसेच, झुनझुनवाला या कार्यक्रमात आणखी एका ’एम’बद्दल बोलले ज्याबद्दल कोणीही अंदाज लावू शकत नाही. ती म्हणजे ’महिला’. म्हणजेच ’मौसम, मौत, मार्केट आणि महिला’ याविषयी अंदाज बांधता येत नाही.

या कार्यक्रमात झुनझुनवाला म्हणाले होते की, शेअर बाजाराचा (Stock Market) राजा कोणी नसतो. स्वत:ला राजा समजणारे आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) पोहोचले. मौसम, मौत, मार्केट, महिला याबाबत कोणीही भाकीत करू शकत नाही. बाजार महिलेसारखा आहे, नेहमी प्रभावशाली, रहस्यमय, अनिश्चित आणि नाजूक. तुम्ही कधीही स्त्रीवर वर्चस्व गाजवू शकत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्ही मार्केटवरही कधी वर्चस्व गाजवू शकत नाही.

 

Rakesh Jhunjhunwala यांची ख्याती मातीला जरी हात लावला तरी त्याचे सोने होईल अशी होती. त्यांना पाहून लोक ठरवायचे की कोणत्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे, कोणत्या स्टॉकमधून पैसे काढायचे. अवघ्या 5 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ते शेयर बाजारात उतरले आणि पुढे जे घडले ते एखाद्या परिकथेसारखेच होते. झुनझुनवाला यांचा जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.

 

Rakesh Jhunjhunwala यांचे यश अफाट होते. शेअर बाजारात (Share Market) यशाची पताका फडकवणार्‍या झुनझुनवाला यांनी स्वत:ची एअरलाइन अकासा एअर (Akasa Air) अलीकडेच सुरू केली. विशेष म्हणजे टाटा समूहाच्या (Tata Group) केवळ एका शेअरने राकेश झुनझुनवाला यांचे नशीब बदलले होते.

आकासा एअरच्या आगमनाने राकेश झुनझुनवाला यांची थेट स्पर्धा टाटा समुहाशी होती. सन 2003 मध्ये Rakesh Jhunjhunwala यांनी टाटा समूहाची आणखी एक कंपनी टायटन कंपनीत (Titan Company) गुंतवणूक (Investment) केली. या एका शेअरने त्यांचे नशीब पालटले. त्यांनी 6 कोटी शेअर्स 3 रुपये किमतीत खरेदी केले. आज त्या एका शेअरची किंमत 1,961.00 रुपये इतकी आहे.

 

हा स्टॉक अजूनही त्यांचा आवडता स्टॉक आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) अनेक कंपन्यांचे शेअर्स होते.
यामध्ये सेल, टाटा मोटर्स (Tata Motors),
टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications), ल्युपिन (Lupine), टीव्ही18, डीबी रियल्टी (DB Realty),
इंडियन हॉटेल्स (Indian Hotels), इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स (Indiabulls Housing Finance),
फेडरल बँक (Federal Bank), करूर वैश्य बँक (Karur Vaishya Bank),
एस्कॉर्ट्स लिमिटेड (Escorts Limited), टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.

 

Rakesh Jhunjhunwala हे मुंबईतील सर्वात महागड्या व प्रतिष्ठित भागात 14 मजली आलिशान घर बांधत होते.
सध्या ते एका अपार्टमेंट ब्लॉकमध्ये दुमजली घरात राहत होते.
पण लवकरच त्यांचे नवीन निवासस्थान मलबार हिलमध्ये असणार होते.
अनेक उद्योगपती आणि कॉर्पोरेट जगतातील नामवंत व्यक्ती या भागात राहतात.
हे घर बांधण्यासाठी झुनझुनवाला यांनी 371 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती.
मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर मानला जातो.

Rakesh Jhunjhunwala यांनी 1985 साली पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवले.
प्रथम 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि 1986 मध्ये आपला पहिला नफा कमावला.
त्यांनी टाटा टी चे शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले आणि तीन महिन्यांनी 143 रुपये प्रति शेअर या दराने विकले.
त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांचा हा प्रवास भारतीय शेअर बाजाराच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल.

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | big bull rakesh jhunjhunwala prediction came
true about share market before six months ago know what he said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा