Rakesh Jhunjhunwala | बिगबुलने 5 दिवसात ‘या’ कंपनीचे विकले 25 लाख शेअर, गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala | शेअर बाजारात बिगबुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) वेळोवेळी आपला पोर्टफोलिओ (portfolio) बदलत राहतात. कधी ते कंपनीतील हिस्सेदारी वाढवतात तर कधी कपात करतात. यावेळी राकेश झुनझुनवाला यांनी डेल्टा कॉर्प (Delta Corp) मधील त्यांची हिस्सेदारी 7.1 टक्क्यांवरून 6.2 टक्क्यांवर आणली आहे. (Share Market Marathi News)

 

शेअरवर झाला परिणाम :
या बातमीनंतर डेल्टा कॉर्पचे शेअर्स बुधवारच्या व्यवहारात 6 टक्क्यांहून जास्त घसरले आणि दिवसाची नीचांकी पातळी 202 रुपये होती. मात्र, नंतर खालच्या स्तरावरून थोडी रिकव्हरी झाली आणि शेअरचा भाव 2.70 टक्क्यांनी घसरून 212.30 रुपयांवर बंद झाला.

 

डेल्टा कॉर्पमध्ये झुनझुनवाला :
नोव्हेंबर 2016 मध्ये, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी त्यांच्या पत्नीसह डेल्टा कॉर्पमध्ये 10% हिस्सा विकत घेतला. ऑक्टोबर 2017 ते 27 मे 2022 पर्यंत, त्यांनी कंपनीतील 57,50,000 शेअरची विक्री केली, ज्यामुळे हिस्सा 7.1 टक्के झाला. (Stock Market Marathi News)

राकेश झुनझुनवाला यांनी 27 मे ते 31 मे दरम्यान सुमारे पाच दिवसांत 25 लाख म्हणजेच 0.9% शेअर्स विकले. यानंतर, डेल्टा कॉर्पकडे आता बिग बुलच्या पोर्टफोलिओमध्ये 6.2 टक्के किंवा 1,65,00,000 शेअर्स आहेत.

 

डेल्टा कॉर्पचा निव्वळ नफा मार्च तिमाहीतही घसरला आहे.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 58 कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च तिमाहीत तो 17 टक्क्यांनी घसरून 48 कोटींवर आला आहे.
मात्र, कंपनीची विक्री किरकोळ वाढून 218 कोटी रुपये झाली.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | big bull rakesh jhunjhunwala sells 25 lakh shares of delta corp stake falls detail here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा